Tuesday, March 25, 2025
Homeनगरराष्ट्रवादीकडून आ. आशुतोष काळेंची उमेदवारी जाहीर

राष्ट्रवादीकडून आ. आशुतोष काळेंची उमेदवारी जाहीर

पक्षाच्या एबी फॉर्मसह शुक्रवारी करणार उमेदवारी अर्ज दाखल

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सोमवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्याच यादीत आ. आशुतोष काळे यांच्या नावाचा समावेश असून त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांचा उमेदवारी अर्ज याच आठवड्यात भरला जाणार आहे. त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर महायुतीचे उमेदवार म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांची उमेदवारी मागील काही महिन्यांपूर्वीच जाहीर केलेली आहे. तेव्हापासूनच आ. काळे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

- Advertisement -

त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारात सक्रीय राहण्यासाठी शुक्रवार दि. 25 रोजी आमदार काळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सभा होणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणाहून शहराच्या मुख्य मार्गावरून अहिंसा स्तंभ, गुरुद्वारा रोड मार्गे तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून आ. आशुतोष काळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...