Friday, May 17, 2024
Homeनगरकोपरगाव सहाय्यक दुय्यम निरीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कोपरगाव सहाय्यक दुय्यम निरीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शासनमान्य देशी दारूचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी तसेच बियर बार परमिट रूमवर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात कोपरगाव येथील सहाय्यक दुय्यम निरीक्षक खलील खुर्शीद शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अकरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

यातील तक्रारदार हे शासनमान्य देशी दारू विक्रेते असून त्यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व त्यांच्या बियर बार व परमीट रूमवर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात खलील खुर्शीत शेख यांनी तक्रारदाराकडे अकरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. काल त्यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून पंचांसमक्ष अकरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

पोलीस अधीक्षक ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सदर कारवाई करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या