Saturday, May 4, 2024
Homeनगरकोपरगावात चौघांचा करोनाने मृत्यू

कोपरगावात चौघांचा करोनाने मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 4 मे रोजी सापडलेल्या 103 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 82 तर खासगी लॅब मधील 59, अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 46 असे 187 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

- Advertisement -

तर शहरातील येवला रोड येथील 53 वर्षीय महिला, दत्त नगर येथील 20 वर्षीय तरूण, ओगदी येथील 38 वर्षीय पुरूष, सुरेगाव येथील 47 वर्षीय पुरूष या चौघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात 5 मे पर्यंत 9 हजार 497 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 8 हजार 344 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 995 अ‍ॅक्टिव पेशंट आहे. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.08 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 136 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या