Friday, May 3, 2024
Homeनगरकोपरगाव तालुक्यात करोनाचे तांडव, सहा मृत्यू

कोपरगाव तालुक्यात करोनाचे तांडव, सहा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 31 मार्च रोजी सापडलेल्या 65 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली,

- Advertisement -

त्यात 83 तर खासगी लॅब मधील 49 व अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 14 असे 146 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरातील 58 व 20 वर्षीय महिला, गांधीनगर येथील 65 वर्षीय पुरुष, टाकळी येथील 58 वर्षीय पुरुष, धारणगाव रोड येथील 65 वर्षीय पुरुष, सोनेवाडी येथील 75 वर्षीय महिला या 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल गुरूवारी दिवसभरात एकूण 146 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील 23, टिळकनगर येथील 1, पांडे गल्ली येथील 1, निवारा येथील 2, ओमनगर येथील 1, सप्तर्षी मळा येथील 2, मार्केट यार्ड येथील 2, खडकी येथील 1, शंकर नगर येथील 1, शिवाजीनगर येथील 2, लक्ष्मी नगर येथील 1, वडांगळी वस्ती येथील 1, शांतीनगर येथील 1, सुभद्रानगर येथील 1, गजानन नगर येथील 2, स्वामी समर्थ नगर येथील 1, ब्राह्मण गल्ली येथील 1, गवारे नगर येथील 1, पानगव्हाणे वस्ती येथील 1, काले वस्ती येथील 1, बालाजी प्लाझा येथील 1, सहकारी बँक कॉलनी येथील 1, साईनगर येथील 2, अंबिका देवी मंदिर येथील 1, प्राजक्ता आपार्टमेंट येथील 2, इंदिरा पथ येथील 4, तेरा बंगले येथील 2, फादर वाडी येथील 1, सुमंगल अपार्टमेंट येथील 2, जोशी नगर येथील 1, साईधाम येथील 1, बँक रोड येथील 1, गांधिनगर येथील 1, धारणगाव रोड येथील 1 तर ग्रामीण मधील सुरेगाव येथील 1, रवंदा येथील 2, वारी येथील 11, कोकमठाण येथील 1, शहाजापूर येथील 5, संवत्सर येथील 5, जेऊर कुंभारी येथील 1, कुंभारी येथील 2, ब्राह्मणगाव येथील 2, संजीवनी येथील 4, मढी येथील 2, पोहेगाव येथील 8, भोजडे येथील 4, शिंगणापूर येथील 2, दहेगाव येथील 2, कारवाडी येथील 1, शिरसगाव येथील 1, सोनेवाडी येथील 6, रांजणगाव येथील 2, देर्डे-कोर्‍हाळे येथील 1, चासनळी येथील 7, मुर्शदपूर येथील 3, धामोरी येथील 1, कोळपेवाडी येथील 4, सांगवी भुसार येथील 1, करंजी येथील 1, टाकळी येथील 2, डाऊच बुद्रुक येथील 1 असे 146 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे. कोपरगाव तालुक्यात 1 एप्रिलपर्यंत 4 हजार 707 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून चार हजार 160 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 551 अ‍ॅक्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत 24 हजार 692 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 19.6 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.23 टक्के असे आहे. तर 58 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या