Saturday, May 4, 2024
Homeनगरकोपरगावमध्ये 18 नवे करोना बाधीत

कोपरगावमध्ये 18 नवे करोना बाधीत

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 29 ऑगस्ट रोजी सापडलेल्या 23 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 73 व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली.

- Advertisement -

या अहवालांपैकी रविवार दि 30 ऑगस्ट रोजी 18 करोना बाधित तर 55 जण निगेटिव्ह आले आहेत. तसेच 25 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

काल आढळलेल्या बाधित रुग्णांत शहरातील गांधीनगर येथील 65 वर्षीय पुरुष,टिळक नगर येथील 9 वर्षीय मुलगा,बस स्टॅन्ड जवळील 37 वर्षीय महिला, निवारा येथील 48 वर्षीय महिला,नवले वस्ती येथील 49 वर्षीय महिला, इंदिरा पथ येथील 75, 48,49 वर्षीय पुरुष तर 66 व 43 वर्षीय महिला,

पांडे गल्ली येथील 321 वार्षिय महिला, सुभाषनगर येथील 80 व 40 वर्षीय पुरुष तर 28 वर्षीय महिला, असे 14 रुग्ण शहरातील तर तालुक्यातील धारणगाव येथील 11 वर्षीय मुलगा,पढेगाव येथील 52 वर्षीय पुरुष, टाकळी येथील 39 वर्षीय पुरुष, मूर्शतपूर येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

आज कोपरगाव तालुक्यात दि. 30 ऑगस्टपर्यंत एकूण 843 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 149 रुग्ण अ‍ॅॅक्टिव्ह आहेत तर 678 रुग्ण बरे झाले आहे. आज पर्यंत एकूण 4 हजार 79 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.

कोपरगाव शहर लॉकडाऊनच्या तिसर्‍या दिवशी वैद्यकीय टीमद्वारे संजयनगर, सुभाषनगर येथील 950 घरे तर 7 हजार 262 नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला. यात 45 संशयित नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली यात 7 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या