Saturday, July 27, 2024
Homeनगरकोपरगाव शहरातील 72 वर्षीय इसमाचा मृत्यू

कोपरगाव शहरातील 72 वर्षीय इसमाचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 25 सप्टेंबर रोजी सापडलेल्या 36 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 214 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली.

- Advertisement -

त्यात 25 रुग्ण तर अहमदनगर येथे तपासणी साठी पाठवलेल्या अहवालांपैकी 2 रुग्ण तसेच खासगी लॅब मधील 4 रुग्ण असे एकूण 33 रुग्ण करोना बाधित आढळून आले. 31 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर शहरातील वाणी सोसायटी येथील 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल दिवसभरात एकूण 33 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील लक्ष्मीनगर येथील 7, बेट येथिल 1, टिळकनगर येथील 1, शिवाजी रोड येथील 4, सह्याद्री कॉलनी येथील 1, तर ग्रामीण मधील शहाजापूर येथील 6, शिंगणापूर येथील 2, वारी येथील 2, संजीवनी येथील 1, माहेगाव देशमुख येथील 1, कोळपेवाडी येथील 1, जेऊर पाटोदा येथील 1, साकरवाडी येथील 1, संवत्सर येथील 1, सुरेगाव येथील 1 असे काल दिवसभरात एकूण33 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे.

तर 31 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात आज 26 सप्टेंबरपर्यंत ऐकून एक हजार 734 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 160 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत तसेच एक हजार 542 रुग्ण बरे झाले आहे. तर आज पर्यंत ऐकून 7 हजार 795 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांचे प्रमाण 22.43 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.78 टक्के असे आहे. आजपर्यंत 31 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या