Saturday, May 4, 2024
Homeनगरकोपरगावात नव्याने 21 करोना संक्रमित रुग्ण

कोपरगावात नव्याने 21 करोना संक्रमित रुग्ण

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 7 डिसेंबर रोजी सापडलेल्या 1 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 53 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

- Advertisement -

त्यात 13 तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 7 तसेच खासगी लॅबमधील 1 असे 21 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसभरात एकूण 21 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यात शहरातील गजानननगर येथील 3, विवेकानंद नगर येथील 2, पांडे गल्ली येथील 1, कोपरगाव येथील1, तर ग्रामीण मधील कोकमठाण येथील 5, रामवाडी येथील 1, सुरेगाव येथील 1, चासनळी येथील 2, कारवाडी येथील 1, कुंभारी येथील 1, गोधेगाव येथील 1, शहाजापूर येथील 2 असे 21 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत. कोपरगाव तालुक्यात आज 8 डिसेंबरपर्यंत दोन हजार 514 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 385 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत 17 हजार 656 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या