Monday, May 26, 2025
Homeनगरकोपरगावात आणखी दोन करोना रुग्णांची भर

कोपरगावात आणखी दोन करोना रुग्णांची भर

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

कोपरगाव शहरासह तालुक्यात 20 डिसेंबर रोजी सापडलेल्या 2 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 29 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून 27 व्यक्तींचे करोना अहवाल हे निगेटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसभरात एकूण 2 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.त्यात शहरातील निवारा येथील 43 वर्षीय महिला तर ब्रिजलाल नगर येथील 7 वर्षीय मुलगी असे 2 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे.

कोपरगाव तालुक्यात आज 21 डिसेंबर पर्यंत एकूण दोन हजार 612 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 526 रुग्ण बरे झाले आहेत. तर आज पर्यंत एकूण 18 हजार 461 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.

कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 14.61 आहे.तर मृत्यूचे प्रमाण 1.64 टक्के असे आहे.तर 43 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner तालुक्यातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या गाढवलोळी येथे सोमवारी (दि.26) दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) एकोणावीस वर्षीय तरुण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. याबाबतची अधिक...