Saturday, May 4, 2024
Homeनगरकोपरगावात नवीन 15 करोना संक्रमित

कोपरगावात नवीन 15 करोना संक्रमित

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 27 डिसेंबर रोजी सापडलेल्या 12 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 35 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

- Advertisement -

त्यात 6 तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 7 तसेच खासगी लॅब मधील 2 असे 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. 29 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसभरात एकूण 15 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील कोर्ट रोड येथील 1, काले मळा येथील 2, निवारा येथील 1,बँक रोड येथील 1 तर तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील 1, रवंदा येथील 1, पोहेगाव येथील 1, ब्राम्हणगाव येथील 2, चासनळी येथील 1, चांदेकसारे येथील 2, येसगाव येथील 2 असे 15 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे.

कोपरगाव तालुक्यात दि. 28 डिसेंबरपर्यंत एकूण दोन हजार 672 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 571 रुग्ण बरे झाले आहे. तर आज पर्यंत एकूण 18 हजार 826 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 14.19. तर मृत्यूचे प्रमाण 1.60 टक्के आहे. 43 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या