Saturday, September 14, 2024
Homeनगरकोपरगावात 58 वर्षीय व्यक्तीचा करोनाने मृत्यू

कोपरगावात 58 वर्षीय व्यक्तीचा करोनाने मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

कोपरगाव शहरासह तालुक्यात 24 सप्टेंबर रोजी सापडलेल्या 34 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 174 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 28 रुग्ण तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 6 रुग्ण तसेच खासगी लॅबमधील 2 रुग्ण असे एकूण 36 रुग्ण करोना बाधित आढळून आले. 35 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर शहरातील छत्रपती शिवाजी रोड येथील 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल दिवसभरात एकूण 36 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शहरातील लक्ष्मीनगर येथील 1, गांधीनगर येथील 1, तर ग्रामीण मधील शहाजापूर येथील 3, शिंगणापूर येथील 3, चांदेकसारे येथील 1 वारी येथील 4, संजीवनी येथील 4, कानलड येथील 1,

दहेगाव येथील 2, बक्तरपूर येथील 7, कोकमठाण येथील 1, माहेगाव देशमुख येथील 1, टाकळी येथील 5, पारेगाव येवला येथील 1 असे काल दिवसभरात एकूण 36 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत. तर 35 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.कोपरगाव तालुक्यात आज पर्यंत 1 हजार 701 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 180 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. 1 हजार 491 रुग्ण बरे झाले आहे. 7 हजार 581 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. 30 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या