Saturday, September 14, 2024
Homeनगरकोपरगावात दोघांचा करोनाने बळी

कोपरगावात दोघांचा करोनाने बळी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

शहरातील 63 वर्षीय पुरुष व तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष अशा दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

तालुक्यात 2 ऑक्टोबर रोजी सापडलेल्या 16 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 202 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 18 रुग्ण करोना बाधित आढळून आले तसेच अहमदनगर येथे पाठवलेल्या रुग्णांपैकी 2 रुग्ण तर खासगी लॅब मधील 1 रुग्ण असे एकूण 21 रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज 29 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल दिवसभरात एकूण 21 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यात शहरातील सुभाष नगर येथील 2, सब जेल येथील 1, साईनगर येथील 1, गुलमोहर कॉलनी येथील1, तर ग्रामीण मधील माहेगाव देशमुख येथील 4, वारी येथील 3, कुंभारी येथील 1, कोळपेवाडी येथील 1, मंजूर येथील 1, साकरवाडी येथील 1, दहिगाव येथील 2, उक्कडगाव येथील 2, रेल्वे स्टेशन येथील 1 असे आज दिवसभरात एकूण 21 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत.

तर 29 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात आज 3 ऑक्टोबरपर्यंत एकूण एक हजार 893 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 113 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत तसेच एक हजार 745 रुग्ण बरे झाले आहे. तर आजपर्यंत ऐकून 9 हजार 122 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. तर 35 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या