कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
शहरातील गजानन नगर परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात (Godavari River) एका अज्ञात पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून मृत व्यक्तीचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे (Kopargav Police Station) पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार, भूषण हांडोरे तसेच पोलिस कॉन्स्टेबल कुंढारे आणि सुशील शिंदे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर, डॉ उल्हारे त्यांची सर्व टीम रुग्णवाहिका चालक अमित खोकले हे सर्व घटनास्थळी पोहचले.
यावेळी शहर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून वैद्यकीय अधिकार्यांनी मृतदेहाच्या शवविचेदनाची प्रक्रिया करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. सध्या मृत इसमाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये अनेक तर्क-वितर्क सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.