Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमKopargav : कोपरगाव शहर व तालुक्यातील अवैध धंद्यावर पोलीसांचा छापा

Kopargav : कोपरगाव शहर व तालुक्यातील अवैध धंद्यावर पोलीसांचा छापा

14 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त || 25 आरोपी ताब्यात

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरसह तालुक्यांमध्ये सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याचे कर्दनकाळ ठरलेले प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी व त्यांच्या विशेष पथकाने आज मंगळवार (1 जुलै) रोजी कोपरगाव शहर व तालुक्यातील येसगाव या ठिकाणी अवैध मटका, जुगार यांच्यावर धडक कारवाई करत सुमारे 14 लाख 13 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल व 25 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगरचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत सुमारे 11 लाख 19 हजार 230 चा मुद्देमाल व 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर खबर मिळताच चार आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.
तसेच कोपरगाव शहरातील रवींद्र ढोक व शंकर वाणी या मुख्य म्होरक्यांच्या मुसक्या आवळत 6 जणांना ताब्यात घेतले आहे. तर या कारवाईत 2 लाख 94 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

YouTube video player

या कारवाईमुळे कोपरगाव शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय करणार्‍यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. कोपरगाव शहरांमध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या या छबीला दुजोरा मिळाला आहे. दरम्यान यात प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, सुमारे शंभर किलोमीटर वरून अहिल्यानगरच्या विशेष पथकाची कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल तर स्थानिक शहर पोलीस ठाणे व त्यातील संबंधित अधिकारी काय करता ? हा प्रश्न यामुळे मोठ्या प्रमाणात जागरूक नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरिक्षक राजेंद्र वाघ, साहाय्यक पोलीस निरिक्षक शकील शेख, पोलीस कॉन्टेबल शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, दिनेश मोरे, भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनिल पवार, अजय साठे, मल्लिकार्जुन बनकर, अमोल कांबळे, सुनिल दिघे आदींनी केली आहे.

ताज्या बातम्या

Online Gaming : धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची...

0
गाझियाबाद । Ghaziabad उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहिबाबाद परिसरातील भारत सिटी...