Wednesday, March 26, 2025
Homeराजकीयकोपरगाव : नगराध्यक्षांनी शहरहिताचा विचार करावा - कुरेशी

कोपरगाव : नगराध्यक्षांनी शहरहिताचा विचार करावा – कुरेशी

कोपरगाव|प्रतिनिधी|Kopargav

जगासह देशभरात करोनाने थैमान घातले आहे. नेहमीच संकटकाळात कोपरगावकराच्या आरोग्याच्या काळजीसाठी धावून येणार्‍या कोल्हे कुटूंबियांनी या काळातही जनतेला आधार देण्याचे काम केले. नगराध्यक्षांनी मात्र फुकटचे सल्ले देण्यापलिकडे काय केले, असा सवाल पालिकेचे बांधकाम सभापती आरिफ कुरेशी यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

सभापती आरिफ कुरेशी म्हणाले, कोल्हे कुटूंबियांचे शहरासाठीचे योगदान सर्वश्रुत आहे. त्यांनी वेळोवेळी विविध माध्यमातून शहरवासियांना मदतच केली आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात निधी आणून शहरात विकासकामे केली. विविध प्रलंबित योजनेसह नवीन कामांसाठी पाठपुरावा करून शहरात चेहरामोहरा बदलण्याचे काम केले.

शहरविकासात राजकारण न करता जनहिताच्या कामांना प्राधान्य दिले. परंतु शहरविकासासाठी नगराध्यक्षांचे कोणतेही ठोस काम नसतांना ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात’ या उक्तीप्रमाणे केवळ हवेतच वल्गना करण्यात धन्यता मानून प्रत्येकवेळी कोल्हे कुटूंबावर आरोप करत असतात.

ज्या-ज्या वेळी कोपरगाव शहरावर संकटे आली त्यावेळी प्रथम कोल्हे परिवार शहराच्या मदतीला धावून आला. महापुर, साथीचे आजार, औषध फवारणी , पाणीटंचाई तसेच सध्याच्या कोरोना आजाराच्या साथीमध्ये आजही तेच पुढे आहे. आपण शहरवासीयांसाठी काय केले? हे सांगावे आणि मगच कोल्हे कुटूंबियावर आरोप करावेत, असे आव्हानही कुरेशी यांनी नगराध्यक्ष वहाडणे यांना केले.

माजी. आ. कोल्हे यांनी शहरातील ऐरणीवर आलेले प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने बैठका घेतल्या. या बैठीकीला वारंवार बोलवूनही नगराध्यक्ष उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे शहरातील खोका शॉप, शॉपींग सेंटर आणि विस्थापित टपरीधारकांचा जागेचा प्रश्न आजही रखडलेला आहे. फक्त आणि फक्त स्नेहलता कोल्हे यांनी प्रश्नात लक्ष घातले म्हणून आपण दुखावला गेला.

आपल्या या कृतीमुळे शहरातील गोरगरीब जनतेच्या पोटाचा प्रश्न लोंबकळत राहिला. शहरासाठी अद्यायावत नाटयगृह करण्यासाठी निधी मिळवून दिला. त्याकामासाठी पाटबंधारे विभागाची जागा मिळविली. परंतु ती ताब्यात घेण्याचे कामही आपण केले नाही. यावरून शहरवासियांचा आपणास किती कळवळा आहे हे दिसून येते.

यातून आपणच खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहात, हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे सातत्याने वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचे आपले उद्योग बंद करावेत, असेही कुरेशी यांनी म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...