Tuesday, May 28, 2024
Homeनगरकोपरगावात मराठा आरक्षण उपोषणात महिला रणरागिनी सहभागी

कोपरगावात मराठा आरक्षण उपोषणात महिला रणरागिनी सहभागी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी कोपरगाव येथे सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. रविवारी पाचव्या दिवशी महिला उपोषणकर्त्यांनी सरकारचा निषेध करत तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान पुष्पा काळे यांच्यासह मराठा समाजाच्या महिला व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव व करंजी या गावात राजकिय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन व मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी कोपरगावात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण बुधवारी सुरू करण्यात आले. रविवारी सकल मराठा समाजाच्यावतीने कोपरगाव शहरामध्ये सर्व महिलाळशह साखळी उपोषण सुरू केले.

यावेळी उमा वहाडणे, विमल पुंडे, बिना भगत, पुष्पा काळे, कविता दरपेल, कमल नरोडे, प्रतिभा गायकवाड, कविता साळुंखे, संगीता नरोडे, सुप्रिया निलेकर, सपना मोरे, प्रतिभा शिलेदार, स्वप्नजा वाबळे या उपोषणकर्त्या महिलांनी राज्य व केंद्र शासनाचा निषेध केला. या आंदोलनाला आ.आशुतोष काळे, शिवसेना नेते राजेंद्र झावरे यांनी उपोषणस्थळास भेट देत पाठिंबा दिला आहे. याचप्रमाणे शिख समाजातर्फे कलवींदरसिंग दडीयाल, मुस्लिम समाजाच्यावतीने महेमूद सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने संतोष गंगवाल यांनी तर शेतकरी कृती समितीच्यावतीने तुषार विध्वंस, गुजराथी समाजाच्या प्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठींबा दर्शविला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्याला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोपरगाव येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान कोपरगाव येथे राज्य परिवहन महामंडळाच्या येणार्‍या-जाणार्‍या बसेस वरती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्या फोटोला काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी अनिल गायकवाड, विनय भगत, अमित आढाव, सुनील साळुंखे, विजय जाधव, बाळासाहेब जाधव आदीसह मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या