Sunday, September 29, 2024
Homeनगरकोपरगाव-संगमनेर रोडवर टेम्पो व स्विफ्ट कारचा अपघात

कोपरगाव-संगमनेर रोडवर टेम्पो व स्विफ्ट कारचा अपघात

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर (Kopargav Sangamner Road) डाऊद खुर्द शिवारात टेम्पो व स्विफ्ट कारचा समोरासमोर अपघात (Accident) होऊन एक जण जबर जखमी झाला. त्यास कोपरगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोपरगावच्या दिशेने जाणारा टेम्पो क्रमांक डी.डी. 03 एल 9664 व संगमनेरच्या दिशेला जाणारी स्विफ्ट कार क्रमांक एम.एच 06 बी.ई. 1525 या दोन गाड्यांचा समोरासमोर वळणावर अपघात (Accident) झाला.

- Advertisement -

या अपघातात स्विफ्ट मधील विजय हरीभाऊ वाकचौरे (रा. जेऊर पाटोदा, ता. कोपरगाव) हे जबर जखमी (Injured) झाले. त्यांना स्थानिकांच्या मदतीने कोपरगाव (Kopargav) येथील एसजेएस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भिषण होता की, स्विफ्ट गाडी एक बाजुने पुर्णपणे दाबली गेली. या वळणावरून जाताना समोरील वाहने लक्षात येत नाही.त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात होत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या