रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh
कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर (Kopargav-Sangamner Road) पोहेगाव-शहापूर शिवारात मोटारसायकल व टेम्पोचा अपघात (Bike and Tempo Accident) झाला असून या अपघातात एक जण जागीच ठार (Death) झाला तर एक जण गंभीर जखमी (Injured) झाला. ही घटना शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. येवला (Yeola) तालुक्यातील अनकुटे येथिल लक्ष्मण मोतीराम तळेकर व अशोक भिकाजी तळेकर हे अकोले (Akole) तालुक्यातील म्हाळादेवी येथे यात्रेसाठी बजाज कंपनीची सीटी 100 मोटारसायकल (क्रमांक एम.एच. 15 जी.सी.0493) चालले होते.
कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील पोहेगाव-शहापूर शिवारात आल्यावर त्यांच्या मोटारसायकलला कोपरगावच्या दिशेने जाणार्या टेम्पोने (क्रमांक एम.एच. 14 जे.एल. 0744) जोराची धडक दिली. त्यात लक्ष्मण तळेकर हे जागेवरच ठार झाले तर अशोक तळेकर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना रुग्णवाहीकेने शिर्डी (Shirdi) येथे रुग्णालयात पाठविले. अपघातानंतर टेम्पो चालकाने त्या ठिकाणाहुन पळ काढला. मात्र शहापूर व पोहेगावच्या युवकांनी त्यास पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले. शिर्डी पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.