Friday, February 6, 2026
Homeनगरकोपरगावात तरूणाला कट्ट्याचा धाक दाखवून मारहाण

कोपरगावात तरूणाला कट्ट्याचा धाक दाखवून मारहाण

श्रीरामपुरातील दोघांवर गुन्हा

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून, लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात घडली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी नाजिम इस्लाउद्दीन शेख (वय 26 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील धारणगाव रोड येथे आरोपी शाहरूख रज्जाक शेख (रा. वॉर्ड न.2 श्रीरामपूर, तौफिक सत्तार रा. वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर), तनवीर रंगरेज (रा. सुभाषनगर कोपरगाव) जान मंहमद मेमन (रा. वार्ड न. 2 श्रीरामपूर, जि. अ.नगर) हे संगनमताने त्याच्याकडील असलेल्या गाडीतून आले व त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून दहशत निर्माण केली व आरोपी शाहारूख रज्जाक शेख व तनवीर रंगरेज यांनी फिर्यादीच्या गळयातील सोन्याची चैन बळजबरीने काढून घेऊन आरोपी शाहरूख रज्जाक शेख याने गावठी कटटा दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली व ते तेथून पळून गेले.

YouTube video player

याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुरनं व कलम 392/2024 बीएनएस कलम 119 (1) 115 (2), 352,351 (2), 3 (5) सह आर्म अ‍ॅक्ट 3/25 प्रमाणे वरील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...