Friday, February 6, 2026
Homeक्राईमकोपरगावच्या तरुणाचा नगरमध्ये खुनाचा प्रयत्न

कोपरगावच्या तरुणाचा नगरमध्ये खुनाचा प्रयत्न

नातेवाईकाच्या लग्नासाठी येताच चॉपर, तलवारीने हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी कोपरगाव येथून अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरात आलेल्या तरुणावर चॉपर व तलवारीने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला आहे. चेतन रवींद्र निंदाणे (वय 26 रा. कोर्ट रस्ता, कोपरगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नालेगावच्या मारूती मंदिराजवळ, टांगे गल्लीत ही घटना घडली.

- Advertisement -

दरम्यान, जखमी चेतन निंदाणे याने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिघांविरूध्द मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ, आर्मअ‍ॅक्ट आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितु सुरेश चव्हाण (वय 45), रोहन जय चव्हाण (वय 25), दाद्या उर्फ सुनील जाधव (वय 27, तिघे रा. मुन्सीपल कॉलनी, गोगादेव मंदिरा जवळ, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. चेतन निंदाणे हे नातेवाईकाच्या लग्नासाठी नगरमध्ये आले होते. त्यांचे मामा लक्ष्मण अर्जुन सारसर यांच्या शेजारी राहणार्‍या संशयित आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून चेतन सोबत पुन्हा वाद घातले.

YouTube video player

या वादातून रोहन याने चॉपरने चेतनवर वार केला. जितुने तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न केला. दाद्या उर्फ सुनीलने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चेतन गंभीर जखमी झाल्याने त्यांना नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मारहाण करणारे घटनास्थळावरून पसार झाले. मात्र घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मारहाण करणार्‍या संशयितांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के. एस. सेदवाड करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...