Sunday, April 20, 2025
HomeनगरRobbery News : कोपरगावमध्ये घडाळ्याच्या दुकानात 33 लाखांचा मुद्देमाल चोरी

Robbery News : कोपरगावमध्ये घडाळ्याच्या दुकानात 33 लाखांचा मुद्देमाल चोरी

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) Kopargav

शहराच्या अहिंसा चौक परिसरातील सचिन वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी 33 लाख 69 हजार रुपयांची घड्याळे व रोख रक्कम लंपास केली. शनीवारी पहाटे साडे तीन वाजता झालेली ही चोरी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. या चोरीत अज्ञात 6 पेक्षा जास्त चोर सहभागी असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. काही मिनिटांत चोरांनी सर्व मौल्यवान घड्याळे बॅगेत भरून हा मुद्देमाल लंपास केला.

- Advertisement -

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील मध्यवर्ती चौकात गुरुद्वारा रोड येथे असलेले सचिन वॉच हे संजय लालचंद जैन यांचे दुकान असून अज्ञात चोरट्यांनी शनीवारी दि.19 एप्रिल रोजी मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास या दुकानच्या समोर आडवी चादर लावत समोरील शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील 29 लाख 22 हजार रुपये किमतीचे टायटन कंपनीचे 155 व टायमेक्स कंपनीचे 120 घड्याळे असे 275 घड्याळे व 3 लाख 47 हजार रुपये रोख रक्कम असा 33 लाख 69 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्म, पो.नि. भगवान मथुरे, स.पो.नि.किशोर पवार, पोसई भुषन हंडोरे यांनी भेट दिली आहे.घटने बाबत संजय लालचंद जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 189/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (4), 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बिबट्या समोर येताच दुचाकीस्वाराने लढविली शक्कल आणि बिबट्या…

0
सिन्नर | प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून डुबेरे परिसरातील शेतकरी, रहिवाशी बिबट्यांच्या दहशतीखाली वावरत असून शुक्रवारी (दि.18) रात्री 9 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष...