Tuesday, March 25, 2025
HomeनगरLeopard : अंजनापुरमध्ये सापडले बिबट्याचे तीन बछडे; परिसरात एकच खळबळ

Leopard : अंजनापुरमध्ये सापडले बिबट्याचे तीन बछडे; परिसरात एकच खळबळ

रांजणगाव देशमुख । वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर शिवारातील बाळासाहेब यशवंत गव्हाणे यांच्या उसाच्या शेतामध्ये सोमवारी दुपारी १५ दिवसाचे बिबट्याचे मादी असलेले तिन बछडे सापडल्याने परिसरात भितीचे वातारण पसरले आहे.

- Advertisement -

या परिसरात सातत्याने बिबटे आढळत असल्याने शेतक-यांना रात्री शेतात जाणे मुश्किल झाले आहे. दोन दिवसापुर्वी प्रसाद गव्हाणे यांनाही आपल्या चिक्कुच्या बागेत भर दुपारी बिबट्या व पिल्ले आढळली होती. ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे त्या ठिकाणी पिंजरे लावण्याची गरज आहे.

रांजणगाव देशमुख परिसरात दिवसेंदिवस बिबट्यांचा वावर लोक वस्तीमध्ये होत असून वाड्या वस्तीवरच्या शेतकऱ्यांचे जनावरे वरती देखील मोठ्या स्वरूपामध्ये बिबट्यांच्या हल्ले होत असून मोठ्या स्वरूपात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे वन विभागाच्या माध्यमातून पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्यात येत असले तरी सध्या उसाच्या शेतामध्ये ऊस तोडणी चालू असून उसाच्या शेताचा सहारा घेऊन मादी बिबट्या त्या ठिकाणी पिल्लांना जन्म देत आहे.

बाळासाहेब गव्हाणे यांच्या शेतातील ऊस तोडणी होत असताना ऊस तोडणी कामगारांना बिबट्याचे तिन बछडे आढळले. त्यांनी शेतकऱ्यांना ही माहिती दिली असता बाळासाहेब गव्हाणे यांनी कोपरगाव वन विभागाशी संपर्क करून माहीती दिली.

बिबट्यांचे बछडे तपासणी वनपरिक्षेत्र अधिकारी पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक श्रद्धा पडवळ तसेच मदतीस अतुल इंदरखे व सागर इंदरखे यांनी हे बछड्यांवरती दिवसभर लक्ष ठेवून जागेवरच ठेवण्यात आले. कारण त्या ठिकाणावरून बछडे उचलल्यास बिबट्या मादी ही चवताळून नरसंहार करू शकते. या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची प्रक्रिया वन विभाग करणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...