Wednesday, June 26, 2024
Homeनगरकोर्‍हाळे येथे मुख्याध्यापकांच्या बदलीमुळे पालक व विद्यार्थी संतप्त

कोर्‍हाळे येथे मुख्याध्यापकांच्या बदलीमुळे पालक व विद्यार्थी संतप्त

कोर्‍हाळे |वार्ताहर|Korhale

- Advertisement -

कोर्‍हाळे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सुरेश लावरे यांच्या बदलीमुळे पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले असून त्यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शाळेच्या प्रांगणात ठिय्या मांडला.

शिर्डीच्या जागेवरून उद्धव ठाकरेंसमोर पेच

कोर्‍हाळे येथे रयत शिक्षण संस्थेचे पाचवी ते दहावी माध्यमिक विद्यालय असून येथील सुरेश लावरे हे गेल्या आठच महिन्यापूर्वी या शाळेत मुख्याध्यापक पदावर रुजू झाले होते. त्यांच्या कामाची कुशलता, विद्यार्थी तसेच शाळेप्रती असलेली आत्मीयता, तळमळ, प्रत्येक अडीअडचणी संदर्भात शालेय कमिटी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांशी चर्चा करून योग्य मार्ग काढत असत. मुख्याध्यापक पदावर रुजू होताच त्यांनी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन शाळेचा चेहरा मोहरा बदलवायचे मोठे काम हाती घेतले आणि शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास करण्यासाठी लोकसहभागातून भरीव निधी उभा करण्याचे आवाहन केले.

शेतकर्‍यांकडील चारा खरेदीचे लवकरच धोरण

माजी विद्यार्थ्यांच्या व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून सुमारे 900 माजी विद्यार्थ्यांना संगठीत केले. या माध्यमातून रंगकाम, कंपाऊंड, सीसीटिव्ही कॅमेरे बसवणे, क्रिडा साहित्य, ग्रंथालय विकास यासाठी दोनच दिवसांत 1.5 लाख रुपये देणगी जमा केली. सदर कामाचा शुभारंभ माजी विद्यार्थ्यांच्याच हस्ते करून कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे. शाळेची चालू असलेली प्रगतीकडील घोडदौड सर्व गोष्टी व्यवस्थित चालू असतानाही या मुख्याध्यापकांची अचानकपणे कुठल्याही नियमात नसतानाही बदली झाल्याने ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी यांनी एकत्र येत रोष व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. मुख्याध्यापकांची बदली तात्काळ रद्द न झाल्यास शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संबंधित प्रशासनाने या मुख्याध्यापकाची बदली रद्द करून त्यांची राहिलेली सेवा याच शाखेत पूर्ण करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासनाला मागणी आहे.

मान्सून अचानक गायब भंडारदराचा विसर्ग बंद

याप्रसंगी राजू कुलकर्णी, बाळासाहेब थोरात, राजू शिरोळे, संजय हेकरे, दिलीप डांगे, अनिल डांगे, नितीन विखे, दत्तात्रय कालेकर, सचिन कानकाटे, बाळासाहेब बोराडे, गणेश ढगे, डॉ. सचिन डांगे, सुरेश भांबारे, संजय दरंदले, कृष्णा मुर्तडक, नवनाथ डांगे, सचिन मुर्तडक, रमेश डांगे, सुधीर डांगे, भिमराज मुर्तडक, रावसाहेब भांबारे, साहेबराव डांगे, दीपक महामुनी, राजू कोळगे, पंढरीनाथ तासकर, तुकाराम डांगे, विलास डांगे, गणेश बनसोडे, संतोष बनसोडे, ग्रामविकास अधिकारी श्री. मगर आदिंसह ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धरणातील पाणी काटकसरीने वापरा कोपरगावात दोन गटात तुफान हाणामारी

माझी बदली ही प्रशासकीय नियमानुसार झालेली असून मला दिलेल्या शाखेत दोन दिवसात नियमानुसार हजर होणे गरजेचे आहे. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची एखाद्या शिक्षकाविषयी आत्मीयता व निर्माण झालेली जिव्हाळ्याची भावना मी समजू शकतो परंतु मलाही संस्थेने ठरवून दिलेल्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे.

– सुरेश लावरे, मुख्याध्यापक

शाळेचे मुख्याध्यापकांची बदली रद्द होऊन ते पुन्हा या शाळेत रुजू होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही. तसेच आमच्या मुलांच्या होणार्‍या शालेय शिक्षणाच्या नुकसानीस संबंधित प्रशासन जबाबदार राहील.

– संजय दरंदले, विद्यार्थी पालक

- Advertisment -

ताज्या बातम्या