Monday, May 27, 2024
Homeनगरकोर्‍हाळे येथे बिबट्या मृतावस्थेत आढळला

कोर्‍हाळे येथे बिबट्या मृतावस्थेत आढळला

कोर्‍हाळे |वार्ताहर| Korhale

ग्रामीण भागात दिवसेंदिवस बिबट्यांचा (Leopard) वावर वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी घराबाहेर निघणेही कठीण झाले. अशातच राहाता (Rahata) तालुक्यातील कोर्‍हाळे (Korhale) येथील शेतकरी दादा काशीराम बनसोडे यांच्या मकाच्या शेतात सहा महिने वयाचा बिबट्या मृतावस्थेत (Leopard Death) आढळून आला.

- Advertisement -

महिलेला केले ब्लॅकमेल; गुन्हा दाखल

यावेळी स्थानिकांनी वन विभागाला (Forest Department) कळविले. वन अधिकारी प्रतिभा सोनवणे, वनपाल श्री. गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी इंद्रभान शेळके, पशु विभागाचे श्री. मेहकर तसेच स्थानिक ग्रामस्थ विलास डांगे, गणीभाई शेख, प्रकाश दिघे यांच्या उपस्थितीत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व बिबट्याचे अग्नीदहन करण्यात आले.

महिलांनी मनपाच्या दारात फोडले माठ

यावेळी वन विभागाच्या (Forest Department) अधिकार्‍यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी दोन बिबट्यांच्या झुंजीत या बिबट्याचा मृत्यू (Leopard Death) झाला असावा. ओटी पोट खाल्ल्याने नर आहे की मादी याचा बोध झाला नाही. बिबट्या मृतावस्थेत (Leopard Death)आढळून आल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाची निवड 8 मार्चला

- Advertisment -

ताज्या बातम्या