Wednesday, February 4, 2026
Homeनगरबँक कर्मचार्‍याकडून 4.72 लाखांचा अपहार; कर्जदारांकडून वसूल केलेली रक्कम बँकेत जमा केलीच...

बँक कर्मचार्‍याकडून 4.72 लाखांचा अपहार; कर्जदारांकडून वसूल केलेली रक्कम बँकेत जमा केलीच नाही

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

कोटक महिंद्रा बँक, नागापूर शाखेतील कर्मचार्‍याने कर्जदारांकडून वसूल केलेली रक्कम बँकेत जमा न करता स्वतःकडे ठेवून 4 लाख 72 हजार 60 रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूक, विश्‍वासघात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

संजय रघुनाथ भंडारे (वय 45 रा. सारसनगर, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. सुनील दिलीप सोनटक्के (रा. चांदगाव रस्ता, सोनटक्के वस्ती, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. सदरची घटना 9 नोव्हेंबर 2023 पासून घडली असून गुरूवारी (7 ऑगस्ट) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

YouTube video player

संजय भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी सुनील सोनटक्के हा कोटक महिंद्रा बँकेच्या नागापूर शाखेत कर्मचारी म्हणून कार्यरत होता. 9 नोव्हेंबर 2023 पासून त्याने बँकेच्या वतीने विविध कर्जदारांकडून एकूण 4 लाख 72 हजार 60 रूपये इतकी रक्कम वसूल केली होती. मात्र, ही रक्कम नियमानुसार बँकेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर 7 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी भंडारे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...