Monday, May 20, 2024
Homeनगरकोठला भागात जुगार अड्ड्यावर छापा

कोठला भागात जुगार अड्ड्यावर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोठला बस स्थानक येथील कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी कारवाई केली. 19 जुगारी पकडण्यात आले असून त्यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परि.पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

गणेश दिलीप कानडे, दत्ता मोतीराम भिंगारे, किरण भगतराम बहुगुणा, सद्दाम गफार शेख, शाहरूख इकबाल पठाण (सर्व रा. कोठला), शेख सिकंदर अहमद, दीपक बाळू वाघमारे (दोघे रा. रामवाडी), अकबर अली कमरअली इराणी (रा. झेंडीगेट), अतुल संजय शिंदे (रा. सिध्दार्थनगर), खलील हसन शेख, शहाबाज पिरमोहंमद शेख, शेख नजीर अन्सार (तिघे रा. भिंगार), शेख नवाज कलाम (रा. लालटाकी), शेख रियाज रसिद, अर्षद आयूब शेख (दोघे रा. मुकुंदनगर), नंदू रूपचंद उल्हारे (रा. काटवन खंडोबा), जावेद पिरमोहंमद सय्यद (रा. फकीरवाडा), सुलतान रशिद शेख (रा. सारसनगर), अनिल सर्जेराव चव्हाण (रा. मंगलगेट) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई दरम्यान पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा 27 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपअधीक्षक कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, परि.उपनिरीक्षक मुगडे, पोलीस अंमलदार आर.एस.वराट, गोल्हार, नगरे, जठार, भानुदास खेडकर, राहुल व्दारके, साठे, गोरे, अडसुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सिध्दी बागेजवळही कारवाई

सिध्दी बागेजवळील जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून चौघांना पकडले. त्यांच्या ताब्यातून जुगाराच्या साहित्यासह साडेआठ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार संदीप गिर्‍हे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास पद्माकर वराडे (रा. भिंगार), निर्मलदास देवराम कांबळे (रा. अरणगाव), अनिल भाऊसाहेब खैरे (रा. पाईपलाईन रस्ता), शेखर शिवाजी साळवे (रा. अरणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या जुगार्‍यांची नावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या