Monday, April 28, 2025
Homeनगर15 हजार मानधन द्या; कोतवाल संघटनेचे महसूलमंत्र्यांना निवेदन

15 हजार मानधन द्या; कोतवाल संघटनेचे महसूलमंत्र्यांना निवेदन

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

महाराष्ट्र कोतवाल संघटनेच्या (Maharashtra Kotwal Association) वतीने कार्याध्यक्ष राजेश गुंजाळ व जिल्हाध्यक्ष योगेश मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर (Sangamner) येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांची भेट घेवून संघटनेच्या विविध मागण्यांचे (Demand) निवेदन देण्यात आले

- Advertisement -

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अनेक दिवसांपासून कार्यरत असलेल्या कोतवालांना (Kotwal) चतुर्थ श्रेणीची मिळावी तसेच सर्व कोतवालांना 15 हजार मानधन (Honorarium) मिळावे. कोतवाल पदनाम बदल करून ‘तलाठी सहायक’ करावे, कार्यरत कोतवालांना लिपिक व तलाठी पदासाठी 40 टक्के आरक्षण मिळावे या मागण्यां (Demand) करण्यात आल्या.

यावर बोलताना लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी दिले. यावेळी राज्य कार्यअध्यक्ष राजू गुंजाळ सचिव एकनाथ साळवे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद कुटे, संगमनेर तालुका उपाध्यक्ष रवींद्र थोरात, जामखेड संघटक मेहबूब शेख, शिवाजी थोरात, संकेत पवार, नवनाथ घारे, सोमनाथ काठे, गणेश जाधव, बाळू बिडवे, दीपक कांबळे, तालुका अध्यक्ष संतोष खोले, गणेश साबळे, मिथुन खोंडे, अरुण हसे, पोपट हसे आदी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...