Saturday, July 27, 2024
Homeनगरकोतवाली पोलिसांकडून 27 गोवंशीय जनावरांची सुटका

कोतवाली पोलिसांकडून 27 गोवंशीय जनावरांची सुटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी (Animals Slaughter) वाहतूक करणार्‍या पिकअपला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) झेंडीगेट परिसरात सापळा लावून पकडले आहे. या कारवाईत 27 गोवंशीय जनावरांची सुटका (Animals Rescue) करण्यात आली असून दोन लाख पाच हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. गुलाब बनीलाल शेख (वय 33 रा. खंड ता. कर्जत), मोहम्मद गौस फकीर महोम्मद कुरेशी (रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट) या दोघांवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

हल्ला करणार्‍यांवर पोलीसांकडून गोळीबार

कोतवाली पोलीस ठाण्याचे (Kotwali Police Station) पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती मिळाली होती की, शहरातील झेंडीगेट परिसरातील आंबेडकर चौकाजवळ गोवंशीय जनावरांना कत्तल करण्यासाठी वाहतूक (Transportation) होत आहे. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीसांनी सापळा लावून मंगळवारी (दि. 18) मध्यरात्री पिकअप पकडला असून 27 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार दीपक रोहकले यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दोन जणांवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. एक लाख 50 हजार रूपये किमतीची पिकअप (एमएच 17 बीडी 4070), तीस हजार रूपये किंमतीच्या दोन जर्सी गायी, पंचवीस हजार रूपये किमतीची 25 जर्शी गाईची वासरे असा दोन लाख पाच हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे.

निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, मनोज कचरे, अंमलदार भांड, शाहीद शेख, प्रमोद लहारे, सुमीत गवळी, रोहकले, जरे यांनी ही कारवाई केली आहे.

खडकाफाटा येथे दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; चौघांना अटक, दोघे फरारखबरदार ! कायदा हातात घ्याल तर…

- Advertisment -

ताज्या बातम्या