Friday, September 4, 2026
Homeक्राईमAhilyanagar : कोतवाली पोलिसांचा ‘नशे’विरोधात धडाका!

Ahilyanagar : कोतवाली पोलिसांचा ‘नशे’विरोधात धडाका!

एका दिवसात तीन कारवाया || 40 नशेची इंजेक्शन्स, 18.25 किलो गांजा जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

शहरातील अवैध नशेच्या पदार्थांची विक्री आणि चोरीच्या घटनांवर कोतवाली पोलिसांनी गुरूवारी (3 सप्टेंबर) धडक कारवाई केली. एका दिवसात केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तरूणांच्या आरोग्यास घातक ठरू शकणारी 40 नशेची इंजेक्शन्स, 18.25 किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच चोरीचा गुन्हा उघडकीस आणत 78 हजार रूपये किमतीचे दोन मोबाइल हस्तगत करण्यात आले. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.

कोतवाली पोलिसांना गांधी मैदान परिसरातील मार्कंडेय शाळेजवळील मोकळ्या जागेत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करता येत नसलेली नशेची औषधे विक्री करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शोध पथकाने दोन पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन कारवाई केली. यावेळी संशयितरित्या उभ्या असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नावे प्रताप अशोक अकोलकर (वय 21, रा. करंजी, ता. पाथर्डी), तेजस गंगाधर वारूळे (वय 21, रा. तपोवन रोड, अहिल्यानगर) आणि तेजस अमित उळागड्डे (वय 22, रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून प्रत्येकी 10 मिली क्षमतेची एकूण 40 इंजेक्शन्स, दुचाकी असा एकूण 35 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, केडगाव परिसरातील वैष्णवनगर येथील तिरंगा चौकात एका व्यक्तीने घराच्या आवारात गांजाचे झाड लावून त्याची विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घराच्या कंपाऊंडमध्ये गांजाचे झाड आढळून आल्यानंतर पोलिसांनी ते झाड ताब्यात घेतले. याप्रकरणी विकास बाळू उमाप (वय 35) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 1 लाख 82 हजार 500 रूपये किमतीचा 18.25 किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दिवशी कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हाही उघडकीस आणला. फिर्यादी भास्कर गंगाधर जाधव (रा. लोहगाव, ता. नेवासा) यांचे पुणे बसस्थानक परिसरातून दोन मोबाइल चोरीला गेले होते. या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा माग काढला. त्यानुसार मोहम्मद इम्रान मोहम्मद जुबेर शेख (वय 21, रा. झारखंड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीस गेलेले मोबाइल हस्तगत करण्यात आले.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौड, रोहिणी दरंदले, राहुल शिंदे, विनोद बोरगे, साबीर शेख, विशाल दळवी, दीपक रोहकले, शिरीष तरटे, सूरज कदम, सत्यम शिंदे, दत्तात्रय कोतकर, अतुल काजळे, अमोल गाडे, सचिन लोळगे, महेश पवार, रमेश शिंदे, संकेत धिवर, अतुल लाटे आदी सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...