Sunday, September 27, 2026
HomeनगरAhilyanagar : पीआय गायकवाड कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी

Ahilyanagar : पीआय गायकवाड कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी

कर्मचार्‍यांमधील कुरघोडी बरोबर गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील महत्त्वाचे असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदावर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबतचे आदेश गुरूवारी (25 सप्टेंबर) काढले आहेत. गायकवाड मानवसंसाधन विभागाचे प्रभारी होते.

- Advertisement -

कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अधीक्षक घार्गे यांनी त्यांची बदली नियंत्रण कक्षात केली होती. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्याच्या पदभार कोण स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निरीक्षक गायकवाड यांनी जिल्ह्यातील जामखेड व पारनेर पोलीस ठाण्याचा कारभार याआधी पाहिला होता. त्यांची पुणे जिल्ह्यात बदली झाली होती. मध्यंतरी ते पुन्हा अहिल्यानगर जिल्ह्यात बदलून आले असून, काही दिवसांपासून ते मानवसंसाधन विभागाचे प्रभारी होते. आता त्यांची नियुक्ती कोतवाली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी करण्यात आली आहे.

दरम्यान, गायकवाड यांच्या समोर मोठे आव्हान आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांमध्ये सुरू असलेली कुरघोडी थांबवणे, चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशा वाढत्या गुन्ह्यांना आळा घालणे आणि घडलेल्या गुन्ह्यांची तातडीने उकल करून आरोपी गजाआड करण्याचे काम त्यांच्यासमोर आहे.गायकवाड यांच्या अनुभवामुळे कोतवाली पोलीस ठाण्याचे कामकाज अधिक प्रभावी आणि सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ३२ तास चालल्या विसर्जन मिरवणुका, डीजेचा दणदणाट कायम; विद्यानंद बापट,...

0
पुणे । Pune गणेश विसर्जन मिरवणुकीतील ढोल-ताशांचा पारंपरिक गजर, आकर्षक देखावे आणि विद्युत रोषणाईसोबत यंदा एका वेगळ्याच चर्चेने पुणेकरांचे लक्ष वेधले. ध्वनिप्रदूषण आणि डीजेच्या मोठ्या...