Friday, March 14, 2025
Homeनगरकोयत्याने मारहाण करून पसार झालेला युवक अटकेत

कोयत्याने मारहाण करून पसार झालेला युवक अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोयत्याने मारहाण (Koyata Beating) करून आठ महिन्यांपासून पसार असलेल्या युवकाला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) सावेडी (Savedi) उपनगरातील निर्मलनगर परिसरातून ताब्यात घेत जेरबंद (Arrested) केले आहे. स्वामीनाथ अनिल सायंबर (वय 23 रा. गाडेकर चौक, निर्मलनगर, सावेडी) असे त्याचे नाव आहे.

- Advertisement -

विहीरीत युवकाचा मृतदेह आढळला

रवी कचरू गोंधळी (वय 28 रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा) यांना स्वामीनाथ अनिल सायंबर व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून कोयत्याने मारहाण (Koyata Beating) करून जखमी (Injured) केले होते. गोंधळी यांनी सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून 12 जानेवारी 2023 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा दाखल (Filed a Case) झाल्यापासून स्वामीनाथ सायंबर पसार झाला होता. तो घरी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्याला निर्मलनगर येथून शिताफिने ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक (Arrested) करण्यात आली आहे.

मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे, अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, रामनाथ हंडाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पाच लाखांच्या मोफत उपचारांसाठी 3 लाख 73 हजार लाभार्थी वाढले

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मढीत मानाची होळी पेटली !

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi सुमारे 473 वर्षांची ऐतिहासिक परंपरा व धार्मिक वारसा असलेली श्रीक्षेत्र मढी येथील मानाची होळी राज्यातील गोपाळ समाज बांधवाच्याहस्ते गुरूवारी सायंकाळी पारंपारिक...