Friday, October 9, 2026
Homeक्राईमJamkhed : कोयत्याच्या धाकाने घरावर दरोडा घालणारी टोळी जेरबंद

Jamkhed : कोयत्याच्या धाकाने घरावर दरोडा घालणारी टोळी जेरबंद

दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे 10 गुन्हे उघड || एलसीबीची कामगिरी

अहिल्यानगर/ जामखेड |प्रतिनिधी| Ahilyanagar | Jamkhed

जामखेड तालुक्यातील जवळा येथे रात्री घरात घुसून चाकू व कोयत्याचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत जामखेड व खर्डा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे तब्बल 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून 6 लाख 92 हजार 500 रूपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जवळा येथील गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार निळकंठ कारखेले, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर आदींच्या पथकाने गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. 7 ऑक्टोबर रोजी या गुन्ह्यातील संशयित प्रदीप उर्फ गुड्या बिडकुत्या काळे (वय 30), अनिल सुल्या पवार (34), सुविकास बिडकुत्या काळे (45), रूक्या उर्फ लोकेश बिडकुत्या काळे (35, सर्व रा. पिंपळगाव आवळा, ता. जामखेड) तसेच समाधान उर्फ कारभारी दीपक काळे (21, रा. वाकी, ता. जामखेड) यांना पिंपळगाव आवळा परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत प्रदीप काळे याने साथीदारांसह जवळा येथील दरोडा केल्याची माहिती दिली.

दरम्यान, या दरोड्याचे नियोजन सारिका चंदन काळे हिने केल्याचेही तपासात समोर आले. चोरी केलेले सोन्याचे दागिने सारिका काळे व तिचा पती परबत उर्फ प्रभाकर उर्फ दीपक तुकाराम शिंदे याच्याकडे दिल्याचे आरोपीने सांगितले. या प्रकरणातील लवचिक्या उर्फ लहु जालींदर पवार, सोन्या नंग्या काळे, परबत उर्फ प्रभाकर उर्फ दीपक शिंदे आणि सारिका चंदन काळे हे सध्या पसार आहेत. समाधान काळे याच्या चौकशीत जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी, आरणगाव, धामनगाव, वंजारवाडी, बुर्‍हाणपूर व चौंडी परिसरात रात्रीच्या वेळी घरफोड्या केल्याची माहिती समोर आली.

ताज्या बातम्या

Shrirampur : खानापूर शिवारात आदिक बंधूंच्या बंगल्यांवर दरोडा

0
माळवाडगाव |वार्ताहर| Malwadgaon श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठच्या खानापूर शिवारात गुरुवारी (दि. 8) पहाटे 2 वाजेच्या सुमारास केटिवेअर रस्त्यालगत असलेल्या बबनराव शामराव आदिक आणि रमेश शामराव आदिक...