Tuesday, May 28, 2024
Homeनगरकोयत्याचा धाक दाखवून लुटणारा अटकेत

कोयत्याचा धाक दाखवून लुटणारा अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणार्‍याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. विश्वास नामदेव गायकवाड (वय 23 रा. श्री स्टाईल चौक, एमआयडीसी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दरम्यान, गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द एमआयडीसी, नगर तालुका, तोफखाना पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

नगर- मनमाड रस्त्यावरील पान विक्रेत्याला कोयता आणि गुप्तीचा धाक दाखवून लुटले होते. ही घटना 29 मे रोजी झाली होती.

याप्रकरणी नितीन सुधाकर गायकवाड (वय 34 रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्ह्याच्या तपास सुरू असताना सदरचा गुन्हा शुभम ऊर्फ छब्या रवींद्र गायकवाड (वय 20 रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) व विश्वास नामदेव गायकवाड (रा. स्टाईल चौक, एमआयडीसी) यांनी केल्याचे निष्पन्न झाले होते. सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश चाहेर, संदीप चव्हाण, राजु सुद्रीक, नेहुल, विशाल थोरात, भागवत, सचिन हरदास, किशोर जाधव, उमेश शेरकर यांनी विश्वास गायकवाड याचा शोध घेत त्याला अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या