Saturday, July 27, 2024
Homeनाशिकट्रायथलॉन वर्ल्डकप २०२३‎ स्पर्धेत येवल्याच्या कृष्णा तनपुरेची चमकदार कामगिरी

ट्रायथलॉन वर्ल्डकप २०२३‎ स्पर्धेत येवल्याच्या कृष्णा तनपुरेची चमकदार कामगिरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अबुधाबी दुबई येथे नुकत्याच‎ झालेल्या ट्रायथलॉन वर्ल्डकप २०२३‎ स्पर्धेमध्ये येवला तालुक्यातील कृष्णा बाबासाहेब तनपुरे या खेळाडूने चमकदार कामगिरी‎ करून कांस्यपदक मिळविले. तर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले.

- Advertisement -

या दोन्हीही स्पर्धांमध्ये पदक मिळविणारा तो‎ भारताचा एकमेव खेळाडू ठरला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील कार्यालयात त्याचा सन्मान केला. यावेळी कृष्णा तनपुरे यास भावी वाटचालीस शुभेच्छा देत शासकीय मदत व नोकरीसाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

“सत्तेतील आमदाराला जास्त निधी मिळतो हा…”; दानवे-भुमरे बाचाबाचीवर आमदार संजय शिरसाटांची तिखट प्रतिक्रिया

येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील रहिवासी कृष्णा बाबासाहेब तनपुरे या खेळाडूने पॅरा ट्रायथलॉन स्पर्धेत देशासाठी पाचवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले तर दोन वेळा नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये यश मिळवीत देशाचे प्रतिनिधित्व केले.

नुकत्यात अबुधाबी दुबई येथे ‎झालेल्या ट्रायथलॉन वर्ल्डकप २०२३‎ स्पर्धेमध्ये त्याने चमकदार कामगिरी‎ करून कास्यपदक तर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. या दोन्हीही स्पर्धांमध्ये पदक मिळविणारा तो‎ भारताचा एकमेव खेळाडू ठरला आहे. तसेच चैन्नई येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदक मिळविले आहे.

मुंबईकरांची लुट होतेय, हिंमत असेल तर टोलनाके बंद करा; आदित्य ठाकरे शिंदे सरकारवर कडाडले

तुर्कस्तान येथे सन २०२२ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सहभाग नोंदविला. तर उजबेकिस्तान येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच डिसेंबर २०२३ मध्ये युरोप येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये तो सहभागी होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी ‘त्यांनी’ बनवलं जगातील सर्वात मोठं कुलूप; वजन अन् किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क

- Advertisment -

ताज्या बातम्या