Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजरिंकू राजगुरू महाडिकांच्या घरच्या सुन होणार? कृष्णराज महाडिक यांनी व्हायरल फोटो मागील...

रिंकू राजगुरू महाडिकांच्या घरच्या सुन होणार? कृष्णराज महाडिक यांनी व्हायरल फोटो मागील सत्य सांगितले

मुंबई | Mumbai
‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांचे अंबाबाई मंदिराच्या आवारातील एकत्रित छायाचित्र बुधवारी प्रचंड व्हायरल झाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच धनंजय महाडिक यांनी काही दिवसांपूर्वीच कृष्णराजचे या वर्षी लग्न उरकायचे आहे, असे म्हटले होते. त्यामुळे कृष्णराज महाडिकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला होता. दोघांचा एकत्र फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, रिंकू बरोबर व्हायरल झालेल्या फोटोवर कृष्णराजने अखेर एका मुलाखतीत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

‘सैराट’ सिनेमामुळे रातोरात प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू ही एका कार्यक्रमासाठी जयसिंगपूर येथे आली होती. कार्यक्रमानंतर रिंकू राजगुरू अंबाबाई दर्शनासाठी गेली होती. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या आवारात कृष्णराज महाडिक यांच्यासोबत तिने फोटो क्लिक केला. या फोटोमध्ये कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू या दोघांच्याही कपाळावर कुंकवाचा टिळा पाहायला मिळतो. त्यामुळे कृष्णराज आणि रिंकू यांनी एकत्र अंबाबाईचे दर्शन घेण्यामागे काही वेगळे कारण आहे का, अशी चर्चा कृष्णराज आणि रिंकू या दोघांच्याही चाहत्यांमध्ये चांगलीच रंगली.

- Advertisement -

सोशल मिडियावरील व्हायरल फोटोनंतर कृष्णराज महाडिक म्हणाले, माझी सर्वांनी विनंती आहे, माझ्या फोटोमुळे गैरसमज करुन घेऊ नका. त्या माझ्या एक चांगल्या मैत्रिण आहेत. त्या कोल्हापुरात सहज एका कार्यक्रम होता, म्हणून आल्या होत्या. त्या दरम्यान आमची भेट झाली. आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो. तिथे आम्ही फोटो काढला आणि माझ्या ऑफिस टीमकडून पोस्ट केले गेला. त्याच्यामुळे भरपूर काही अफवा बाहेर पडत आहेत. ज्या चर्चा केल्या जात आहेत, तसे काहीही नाहीये.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...