शासकीय अधिकार्यांच्या आणि सीसीआय कापूस खरेदी केंद्र चालकाच्या हलगर्जीपणामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळामध्ये होरपळणार्या शेतकर्यांनी उरलासुरला कापूस वेचून विक्रीसाठी केंद्राच्या शासकीय खरेदी संस्थेवर आणला.
मात्र गेल्या आठ दिवसांपासून व्यापार्यांकडून कापूस खरेदी केला जात नसल्याचं शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यातच विक्रीसाठी कापूस आणताना वाहन खर्चाचा अतिरिक्त बोजाही शेतकर्यांना सोसावा लागत आहे.
अधिकारी या बाबतीत लक्ष देत नाही, असा आरोप कापूस उत्पादक शेतकरी करत आहेत. मुख्यत्वे केंद्र शासनाची सीसीआयची कापूस खरेदी केंद्रं अचानक बंद केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिनिंगवर कापसाच्या शेकडो गड्या उभ्या आहेत.
शेतकरी आठ दिवसांपासून रात्रंदिवस कापसाच्या विक्रीची वाट पाहत बसून आहेत. अशात कापसाची खरेदी केंद्र बंद झाल्यानं व्यापार्यांकडून शेतकर्यांची लूट केली जात आहे. शेतकर्यांकडून कापसाची मातीमोल भावानं खरेदी केली जात आहे.
अशा स्थितीत शेतात हंगामाची काम सुरू असताना ती टाकून कापूस विक्रीसाठी कधी नंबर येईल या आशेवर आठ दिवसांपासून बसलेले शेतकरी वैफल्यग्रस्त झाले आहेत. शिवाय कापूस घेऊन आणलेली वाहनं उभी ठेवावी लागत असल्यामुळं त्याचं भाडंही द्यावं लागतं आहे.
एकीकडं शासकीय खरेदी केंद्र बंद आणि दुसरीकडं व्यापार्याकडून होणार्या लुटीमुळे कापूस उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली. यामुळे वैतागलेले शेतकरी लवकर सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणी करत आहेत. मात्र, सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राबाबत अधिकारी काही बोलायला तयार नाहीत.
त्यातच बाजार समितीचे अधिकारीही केंद्र सरकारचा आदेश मिळेपर्यंत सीसीआयची केंद्रं सुरू केली जाणार नाहीत, असं सांगतात. एकंदर या सार्या प्रकरणात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कापूस उत्पादक शेतकर्यांना तोटा सहन करावा लागत आहे.