Friday, April 25, 2025
Homeनगरपारनेर, श्रीगोंदा-कर्जतसाठी कुकडीतून आवर्तन - ना. विखे

पारनेर, श्रीगोंदा-कर्जतसाठी कुकडीतून आवर्तन – ना. विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेऊन कुकडीच्या डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सुरू करण्यात आल्याची माहिती महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. कुकडीच्या आवर्तनाबाबत यापुर्वीच आवर्तनाच्या नियोजना संदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकी मध्ये आवर्तनाची तारीख नंतर ठरविण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

- Advertisement -

मात्र, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यांमध्ये निर्माण झालेली पाणी टंचाई तसेच नगर आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांनी पिण्याच्या पाण्याची केलेली मागणी विचारात घेवून मंत्री विखे पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी, तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून कुकडी डाव्या कालव्यांमध्ये पाणी सोडण्याबाबत तातडीने निर्णय करण्याच्या सूचना दिल्या. सद्यपरिस्थितीत कुकडी प्रकल्पाचा पाणीसाठा संपुष्टात आला असून डाव्या कालव्याचे आवर्तन करण्यासाठी पिंपळगाव जोगे धरणातील मृत साठ्यातून पाणी घेणे आवश्याक होते.

त्यानुसार 25 मे पासून पिंपळगाव जोगे धरणातून येडगावमध्ये पाणी घेण्यात येत असून कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. उन्हााची तिव्रता लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...