Thursday, May 30, 2024
Homeनगरभंडारींवर खुनी हल्लाकरणारे दोघे अटकेत

भंडारींवर खुनी हल्लाकरणारे दोघे अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बजरंग दलाचे पदाधिकारी कुणाल सुनील भंडारी (वय 29 रा. आनंदनगर, स्टेशन रोड, नगर) यांच्यावर सोमवारी रात्री झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. जाकीर मोहम्मद अली तांबोळी (वय 45) व नासीर शेख (दोघे रा. रामवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास रामवाडी परिसरात कुणाल भंडारी यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. जखमी भंडारी यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून नासीर शेख, अल्तमश शेख, सादीक शेख मौलाना, सलमान हिनु शेख, सलमान अस्लम शेख, जाकीर तांबोळी, अश्फाक शेख, अफजल शेख, सहेबान जहागीरदार यांच्यासह अन्य 20 ते 25 जणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करीत आहेत. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भान्सी यांच्या पथकाने मंगळवारी जाकीर तांबोळी व बुधवारी नासीर शेख याला अटक केली आहे. इतरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या