Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकुंदेवाडी रेल्वेगेट 'या' कालावधीत राहणार बंद

कुंदेवाडी रेल्वेगेट ‘या’ कालावधीत राहणार बंद

निफाड। प्रतिनिधी Niphad

- Advertisement -

पिंपळगाव-निफाड मार्गावरील कुंदेवाडी रेल्वे फाटक क्र. 99 या मध्ये रेल्वेचे रेल्वे फाटक कामकाजाच्या दृष्टीने मंगळवार (दि.8) जुलै रात्री 8 वाजेपासून (दि.9) जुलै सकाळी 8 वाजेपर्यंत तर बुधवार (दि.9) जुलै रात्री 8 ते गुरुवार (दि.10) सकाळी 8 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती निफाड रेल्वे स्थानक प्रबंधक यांनी दिली आहे.

YouTube video player

या मार्गावरील जाणार्‍या वाहनधारकांनी व नागरिकांनी रेल्वे कामकाज होत असल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब निफाड, शिवडी, उगाव, खेडे, नांदुर्डी, पंचकेश्वर, दावचवाडी असा पिंपळगाव मार्गाकडे जाण्यासाठी करावा. तसेच पिंपळगावकडून येणार्‍या नागरिकांनी पिंपळगाव, लोणवाडी, पालखेड मिरची, रानवड, मुंजाबा फाटा, वनसगाव, उगाव, शिवडी, निफाड किंवा पिंपळगाव, लोणवाडी, पालखेड मिरची, काकासाहेबनगर, नांदुर्डी मार्गे निफाड असा करावा, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...