Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजKurla Best Bus Accident: बेस्ट बस अपघाताप्रकरणी आरोपी बसचालक मोरेला २१ डिसेंबरपर्यंत...

Kurla Best Bus Accident: बेस्ट बस अपघाताप्रकरणी आरोपी बसचालक मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी; चौकशी समिती स्थापन

मुंबई | Mumbai
कुर्ला येथे सोमवारी रात्री बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. भरधाव बेस्ट बसने दिलेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघाताप्रकरणी बस चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली असता न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बेस्ट अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी वाहतूक विभागाचे मुख्य व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

कुर्ला बस अपघाताप्रकरणी आरोपी ड्रायव्हर संजय मोरे याला कोर्टाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. तर आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीची काय गरज आहे? असा प्रश्न उपस्थित करत युक्तिवाद केला होता. पण पोलिसांनी या प्रकरणात आरोपीचे किंवा इतर कुणाचे काही षडयंत्र होते का? याबाबत तपास करायचा असल्याने आरोपीची ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.

- Advertisement -

कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत बेस्ट बस चालक संजय मोरे याला अटक केली होती. त्याला आज कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संजय मोरेला ११ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

आरोपीला थेट टॅक्सीतून आणले
कुर्ला बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरेला न्यायालयात हजर करताना पोलिसांनी पत्रकारांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची एक व्हॅन मुख्य प्रवेशद्वारासमोरून न्यायालयात आली. या व्हॅनमध्येच संजय मोरे असल्याचे वाटले. माध्यम प्रतिनिधी, बघ्यांची गर्दी सर्व पोलिसांच्या व्हॅनमागे धावले. प्रवेशद्वाराची गर्दी कमी झाल्याचे दिसताच पोलीसांनी टॅक्सीमधून कोणाच्याही लक्षात न येता मागच्या प्रवेशद्वारातून न्यायालयात आणण्यात आले. संजय मोरेला आज न्यायालयात हजर करण्यात येणार होते. पत्रकार देखील मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबले होते. मात्र पोलिसांना याची कल्पना येताच आरोपीला न्यायालयाच्या मागच्या प्रवेशद्वारातून कोर्टात आणले.

कोर्टात काय घडले?
न्यायालयात युक्तिवाद वकिलांनी पोलीसांची बाजू मांडली. या वेळी वकिलांनी सोमवारी रात्री घडलेली सर्व घटना सांगितली. ही बस वातानुकूलित असून 332 या मार्गावर धावत होती. कुर्ला ते अंधेरी अशा मार्गाने ही बस जात होती. कुर्ला पश्चिम आंबेडकरनगर परिसरात हा भीषण अपघात झाला आहे.22 गाड्यांचे नुकसान झाले आहे. अद्याप तपास करणो बाकी असून या घटनेचे साक्षीदार 70 पेक्षा अधिक आहे. त्यामुळे सात दिवसाची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर न्यायालयनाने आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बेस्टकडून समिती स्थापन
बेस्ट बस चालक संजय मोरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पण यामध्ये चुकी नेमकी कोणाची? यावर आता सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. अशामध्ये आता बेस्टनेदेखील या संदर्भात महत्त्वाची पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची तातडीची मदत त्यांनी जाहीर केली आहे. कुर्ला बेस्ट अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी वाहतूक विभागाचे मुख्य व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच जखमींवरील औषधोपचारांचा खर्च मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट उपक्रम यांच्यामार्फत केला जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

अपघातावेळी आरोपीने मद्यप्राशन केले होते की नाही?
बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल दिग्गीकर यांनी सांगितले की, हा अपघात घडला त्या वेळी बस चालकाने मद्यपान केले नव्हते. पोलिसांच्य तपासामध्येही अशी काही गोष्ट आढळली नाही. आता या प्रकरणी दोन समित्या स्थापन केल्या असून त्याचा अहवाल येत्या दोन दिवसात सादर केला जाईल अशी माहितीही अनिल दिग्गीकर यांनी दिली.

बेस्ट बसचे महाव्यवस्थापक अनिल दिग्गीकर म्हणाले की, अपघात होताना चालकाने मद्यपान केल होते अस कुठही निदर्शनास आले नाही. पोलिसांच्या अहवालात देखील असे काही नमूद नाही. तो नवीन ड्रायव्हर नाही. याआधी देखील त्याने ड्रायव्हिंग केल आहे. चार वर्षे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्याने काम केले आहे.

अपघातात सात जणांचा मृत्यू
सोमवारी रात्री कुर्ल्यामध्ये एका भरधाव बेस्ट बसने रस्त्यावरील अनेकांना जोरदार धडक देत वाहनांसह नागरिकांना चिरडले. ३३२ नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडला. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल ६० प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४८ जण जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...