धुळे dhule। प्रतिनिधी
धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे सध्या (Kusumba farmer) शेतकरी कुणाल शिंदे (Kunal Shinde) यांच्या अनोख्या प्रयोगाचीच (unique experiment) चर्चा आहे. कारण त्यांनी त्यांच्या 15 एकर क्षेत्रावर तुर्की बाजरीची (Turkish millet) पेरणी केली आहे. हे पिक ऊसा पेक्षाची उंच गेले असून बाजरीचे कणीस (corn is about three feet long) तब्बल तीन फुटांचे आहे. त्यामुळे शिंदे याच्या शेताजळून जाणारा व्यक्ती पिक पाहण्यासाठी थांबला नाही म्हणजे आर्श्चयच म्हणावे लागले. पंधरा एकरांत 600 क्वींटल उत्पन्न अपेक्षित असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शेतकरी कुणाल शिंदे यांनी 15 एकर क्षेत्रावर तुर्की बाजरीची पेरणी केली आहे. या बाजरीचे कणीस तब्बल तीन फुटांपर्यंत लांब आहे. त्यात दाण्यांची संख्या अधिक असल्याने वजन 200 ग्रॅमपेक्षा जास्त आहे.
या बाजरीची चव, रंग आणि भाव देखील साधारण बाजरीसारखाच आहे. शिंदे यांनी प्रथमच हा प्रयोग केला असून यातून एकरी 40 क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना त्यांनी ही कणसे दाखवली आहेत. त्यातून शेतकर्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सूचना केल्याचे शिंदे यांनी सांगितले. कुणाल शिंदे हे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांचे सुपुत्र आहेत.