Saturday, May 4, 2024
Homeजळगावदुसर्‍या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू

दुसर्‍या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

बंगल्यात काम करीत असलेल्या कैलास बाबुराव महाजन (42, रा.नशिराबाद) या मजुराचा (labour) दुसर्‍या मजल्यावरुन (Falling second floor) पडून दुर्देवी मृत्यू (death) झाल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मेहरुण परिसरातील गायत्री नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दुपारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

- Advertisement -

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील कैलास महाजन हे नशिराबाद येथे आई-मुलासह वास्तव्यास होते. बगिच्याची कामे करणारे ठेकेदार प्रकाश मराठे यांच्याकडे ते कामाला होते. मराठे यांनी मेहरुण परिसरातील गायत्री नगरातील एका बंगल्यातील बगिच्याचे काम त्यांनी घेतले होते.

याठिकाणी शनिवारी सकाळी कैलास महाजन काम करण्यासाठी आले. बगिच्याचे काम करीत असतांना सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक बंगल्याच्या दुसर्‍या मजल्यावरून पडून ते त्यांच्या हाता-पायाला तसेच डोक्याला दुखापत होवून गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत काम करणार्‍या इतर मजुरांना ही घटना दिसताच त्यांनी महाजन यांना तत्काळ त्यांना वाहनातून जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले.

नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी

रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांनी केलास महाजन यांची तपासणी केली असता, त्यांना वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयत घोषीत केले. यावेळी मराठे यांच्यासह महाजन यांच्या नातेवाईकांची रूग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास विकास सातदिवे आणि ललित नारखेडे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या