Friday, February 6, 2026
Homeक्राईमCrime News : मजुरांना डांबून ठेवत जबरदस्तीने काम करून घेतले

Crime News : मजुरांना डांबून ठेवत जबरदस्तीने काम करून घेतले

एमआयडीसीच्या कंपनीत वेठबिगारीचा प्रकार उघड || सात जणांची सुटका

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नागापूर एमआयडीसी परिसरातील क्लासिक व्हील कंपनीत मजुरांची इच्छा नसतानाही त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेत त्यांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलासह सात जणांची वेठबिगारीतून सुटका करण्यात आली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठेकदारासह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदार राजेंद्र यादव (पूर्ण नाव माहिती नाही), गणेश बाळासाहेब आढाव व सुपरवायझर शहबाज अली मोहमंद शेख (पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धिरेंद्रप्रताप पुष्पराज सिंग (वय 27, हल्ली रा. चेतना कॉलनी, नवनागापूर, अहिल्यानगर, मुळ रा. सिध्दी, ता. जि. बनारस, मध्यप्रदेश) या मजुराने फिर्याद दिली आहे. धिरेंद्रप्रताप सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 25 ऑक्टोबर 2025 ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ठेकेदार राजेंद्र यादव, गणेश आढाव आणि सुपरवायझर शहबाज शेख यांनी फिर्यादी आणि त्यांच्यासोबतच्या पियुष मरकम, लक्ष्मणसिंग राजकरण सिंग, जगदबहादुरसिंग मगलसिंग, रविसिंग सोटीया, दीपक राजभर व एका अल्पवयीन मुलाला कामावर ठेवले होते. या मजुरांची तिथे काम करण्याची इच्छा नसतानाही संशयित आरोपींनी त्यांना जबरदस्तीने कामाला लावले.

YouTube video player

मजुरांनी आपल्या गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली असता, संशयित आरोपींनी त्यांना वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यापासून रोखत त्यांना वेठबिगारी करण्यास भाग पाडले गेले. याप्रकरणी पोलिसांनी वेठबिगारी उच्चाटन कायद्यासह विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोंढे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Shirdi : साई संस्थान सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलला ‘बुस्टर डोस’ची गरज!

0
शिर्डी | Shirdi संपूर्ण जगाला श्रद्धा व सबुरीची शिकवण देणारे साईबाबांनी त्यांच्या हयातीत अनेक प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रोगी रुग्णांना विविध प्रकारचे जडीबुटी तसेच उदी...