नवी दिल्ली – लडाख सीमावादावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला सुनावले आहे. भारत-चीन सीमेवर चीनची आक्रमक भूमिका ही जगातील अन्य भागातील चीनच्या आक्रमकतेच्या पॅटर्नशी सुसंगत आहे. अशा कृतीमधून चिनी कम्युनिस्ट पार्टीचे मूळ स्वभाव दिसून येतो, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत-चीन सीमावादाच्या विषयावर व्हाईट हाऊसची आतापर्यंत थोडी सौम्य भूमिका होती, परंतु प्रथमच इतक्या कठोर शब्दात चीनला फटकारल्याचे वॉशिंग्टनमधील भारत-अमेरिका संबंधांच्या अभ्यासकांनी सांगितले.
पूर्व लडाखच्या सीमेवर निर्माण झालेल्या संघर्षमय परिस्थितीस चीनची आक्रमकता जबाबदार असून या काळात अमेरिका भारताच्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.
गलवान खोर्यात झालेल्या संघर्षानंतर पूर्व लडाखमधील परिस्थितीवर अमेरिकेचे अत्यंत बारीक लक्ष आहे. भारत व चीन दोघांनी तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीत शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याला आमचा पाठिंबा आहे, असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिवाने म्हटले आहे.
भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव 59 चिनी प्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीला अमेरिकेनेही समर्थन दिले आहे. या बंदीमुळे भारताचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेला चालना मिळणार असल्याचे मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केले. चीनमधील कम्युनिस्ट पक्षासाठी सहायक म्हणून काम करणार्या या प्सवर भारताने घातलेल्या बंदीचे आम्ही स्वागत करतो, असे त्यांनी म्हटले आहे.