Monday, March 31, 2025
HomeनगरLadaki Bahin Yojana : दीड हजार लाडक्या बहिणींच्या नावे चारचाकी

Ladaki Bahin Yojana : दीड हजार लाडक्या बहिणींच्या नावे चारचाकी

महिला बालकल्याणसह परिवहन विभागाकडून पडताळणी सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारकडून महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ घेणार्‍या जिल्ह्यातील महिलांची पडताळणी राज्य पातळीवरून सुरू करण्यात आली आहे. यासाठी सरकार पातळीवरून परिवहनकडे नोंदणी असलेल्या महिलांची यादी प्रत्येक जिल्ह्याच्या महिला बालकल्याण विभाग पाठवण्यात आली होती. या यादीनूसार जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेत पात्र ठरलेल्या आणि आर्थिक लाभ घेतलेल्या महिलांची पडताळणी करण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनूसार नगर जिल्ह्यात दीड हजार महिलांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे समोर आले आहे. या सर्व महिलांची माहिती आता सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात बारा लाखांहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असून लाभ घेणार्‍या पात्र महिलांची आता सरकार पातळीवरून पडताळणी करण्यात येत आहे. एकीकडे राज्य सरकार पातळीवरून ही योजना बंद करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी योजनेत पात्र नसतांनाही लाभ घेणार्‍यांची शोध मोहीम सरकारच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत सुरुवातीला केवळ महिलांच्या प्रतिज्ञापत्रा आधारे त्यांचा या योजने समावेश करण्यात आला. तसेच त्यांना महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत सुरू करण्यात आली.

एकट्या नगर जिल्ह्यात या योजनेत 12 लाखांहून अधिक महिला पात्र करण्यात आल्या होत्या. सुरुवातीचे तीन महिने या योजनेत महिलांना आर्थिक लाभ देण्यात आली. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर राज्य पातळीवरून लाडक्या बहिणी योजनेत पात्र असणार्‍या महिलांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी सरकार पातळीवरून पहिल्या टप्प्यात परिवहन विभागाकडे नोंदणी असणार्‍या चार चाकी वाहन नावावर असणार्‍या महिलांची माहिती घेण्यात येत आहे. सरकार पातळीवरून मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील 20 ते 22 हजार महिलांची यादी महिला बालकल्याण विभागाकडे पडताळीसाठी पाठवण्यात आली होती.

या यादीनूसार पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील दीड हजार महिलांच्या नावे चारचाकी वाहन असून त्यांची माहिती आता सरकारला पाठवण्यात येणार आहे. सरकार पातळीवरून या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ सुरू ठेवायचा की बंद करावयाचा याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. चारचाकी वाहन असणार्‍या महिलांच्या नावाच्या यादीबाबत योजनेचे नोडल अधिकारी तथा जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी नारायण कराळे यांच्याकडे विचारणा केल असता राज्य पातळीवरून चारचाकी वाहन नावावर असणार्‍या महिलांची यादी ही परिवतन खात्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले सांगण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

यंदा भरपूर पाऊस, अन्नधान्यही मुबलक

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यावर्षी महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडून...