Tuesday, June 16, 2026
HomeनगरAhilyanagar : लाडकी बहिण; ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वितरीत

Ahilyanagar : लाडकी बहिण; ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वितरीत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणार्‍या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, राज्य सरकारकडून निधी वितरित केला आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. या निधी वितरणाच्या संदर्भात राज्य सरकारने जीआर सुद्धा काढला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा निधी मिळावा यासाठी राज्य सरकारकडून निधी वितरित करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरणाच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात 3960.00 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे.

त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी रु. 344.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण-२०२६ जाहीर

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai राज्याच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरुपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण - २०२६ ला मंगळवारी...