Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्र'लाडकी बहीण' योजनेमध्ये आणखी सहा महत्त्वाचे बदल, अर्ज भरण्यापूर्वी वाचा सर्व माहिती

‘लाडकी बहीण’ योजनेमध्ये आणखी सहा महत्त्वाचे बदल, अर्ज भरण्यापूर्वी वाचा सर्व माहिती

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रात काही आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सर्वसामान्य महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

- Advertisement -

माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज सहज आणि सोप्या पद्धतीने करता यावे, यासाठी काही नियमांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ६ नवीन नियम व अटी आणि शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे. याबद्दलचा शासन निर्णयही लवकरच लागू केला जाणार आहे.

हे देखील वाचा : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला कडक शब्दात दिला ‘हा’ इशारा

लाडकी बहिण योजनेतील ६ नवे बदल

पोस्ट बँक खाते असल्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य धरणार
दुसऱ्या राज्यातील महिलेने महाराष्ट्रातल्या पुरूषा बरोबर लग्न केल्यास पतीच्या कागदपत्रावर तिला लाभ मिळेल.
गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार, त्यात बदलही केले जाणार.
केंद्राच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही यापुढे लाभ मिळणार.
नवविवाहीत महिलेची नोंदणी शक्य नसेल, तर पतीचे रेशनिंग कार्ड ग्राह्य धरणार.
ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात येणार.

हे देखील वाचा : Union Budget 2024 : अर्थसंकल्पात बिहार, आंध्रला रिटर्न गिफ्ट; महाराष्ट्राला मात्र ठेंगा, मविआच्या खासदारांचे आंदोलन

महायुती सरकारची ही महत्वकांक्षी योजना आहे. त्यामुळे या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळाला असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच योजना घोषीत झाल्यापासून आता पर्यंत या योजनेत अनेक अटी शर्तींमध्ये शिथिलता आणण्यात आली आहेत. जेणे करून महिलांसाठी सुलभ होईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...