Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana : याला काय म्हणावं? लाडकी बहीण योजनेत चक्क पुरुषांचे...

Ladki Bahin Yojana : याला काय म्हणावं? लाडकी बहीण योजनेत चक्क पुरुषांचे अर्ज, असा झाला भांडाफोड

कन्नड | Kannad

सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची चर्चा सगळीकडे जोरात सुरु आहे. एकीकडे या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असतानाच काही गैरप्रकार होत असल्याचेही उघडकीस येत आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच साताऱ्यामधील एकाच व्यक्तीने या योजनेचे तब्बल ३० अर्ज करुन मोठा घोटाळा केल्याचे समोर आले होते. अशातच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चक्क अर्ज भरल्याचं प्रकरण समोर आलं आहे. हा सारा प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये घडला आहे.

या तालुक्यामधून लाडकी बहीण योजनेअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या पडताळणीचं काम सुरु असताना हा प्रकार उघडकीस आला. बालकल्याण विभागाकडून अर्ज पडताळणी केली जाते. बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांना पडताळणीदरम्यान हा प्रकार समजला.

हे ही वाचा : एका महाराजांवर कोपरगावात हल्ल्याचा प्रयत्न

बहीणींच्या पैशावर डोळा ठेवणाऱ्या या १२ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने दिलेल्या पोर्टलवर स्वत:च्या आधारकार्डाचा फोटो अपलोड केला. तसंच त्यांनी हमीपत्रामध्येही स्वत:चं नाव लिहिलं. मात्र फोटो अपलोड करताना त्यांनी महिलांचा फोटो वापरला होता.

सविस्तर तपशील तपासला जाणार नाही असा या लोकांचा अंदाज होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला आणि पडताळणीदरम्यान हा बनाव उघडकीस आला. या प्रकरणामध्ये आता चौकशीचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी काल एका ठिकाणी भाषण करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. नवी मुंबईतील प्रकरणाचा दाखला देत ते म्हणाले होते की आम्ही देतो पण फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगात ही टाकतो. मग चक्की पिसिंग करा, असा इशारा अजित पवारांनी दिला होता.

हे ही वाचा : Crime News : चोरट्यांचा धुमाकूळ! शेतकऱ्याच्या डोक्यात हत्याराने वार करून केले…

काय आहे लाडकी बहीण योजना?

राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह १५०० रुपये जमा होणार आहेत. २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या