Thursday, May 1, 2025
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana : एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या...

Ladki Bahin Yojana : एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या…

मुंबई | Mumbai

अक्षय्य तृतीयेचा सण बुधवार (30 एप्रिल) रोजी होता. याच दिवशी राज्यातील लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र अक्षय्य तृतीयाचा (Akshaya Tritiya) सण ही झाला तरी पण एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही. याचदरम्यान महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Women and Child Development Minister Aditi Tatkare) यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहिण योजना महायुतीची महत्वकांक्षी योजना आहे. एप्रिल महिन्याच हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच वितरित होणार आहे असे त्यांनी सांगितले. मात्र लवकरच म्हणजे नेमकं कधी? ते त्यांनी पूर्णपणे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याच्या 1500 रुपयांसाठी आणखी काही वाट पहावी लागणार काय? असे दिसते आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरली होती. निवडणुकीत आश्वासनं दिल्याप्रमाणे बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार हा सवाल सातत्याने विचारला जातोय पण त्यावर नेत्यांनी, सरकारमधील मंत्र्यांनी अद्यापही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. लाडक्या बहिणीचे लक्ष एप्रिलचा हप्ताकडे लागले आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल कार्यक्रमादरम्यान आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या संबंधी वक्तव्य केल्याने महिलांचा उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या