मुंबई l Mumbai
‘लागिरं झालं जी’ फेम जिजीचं पात्र साकारणार्या अभिनेत्री कमला ठोके (Kamala Thoke) यांचे काल (14 नोव्हेंबर) निधन झाले आहे. त्या 74 वर्षांच्या होत्या. कर्करोगानं त्रस्त असलेल्या कमल ठोके यांच्यावर बेंगळुरू इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळं मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
कमला ठोके शिक्षक आणि मुख्याध्यापिका होत्या. शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी काही चित्रपटातदेखील काम केले होते. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये त्या सहभागी होत असे. ‘सखा भाऊ पक्का वैरी’, बरड, भरला मळवट, कुंकू झालं वैरी अशा सिनेमांमध्येही त्यांनी कामं केली होती. 33 वर्ष शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर 2015साली त्या निवृत्त झाल्या होत्या. डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते सातारा जिल्हा परीषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
कमल ठोके यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर कराड येथील त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.