इंदिरानगर | प्रतिनिधी
लोन मंजूर करून देण्याचे अमिष दाखवत वेगवेगळ्या फी च्या नावाने तब्बल नऊ लाख साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला असून या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अमोल अशोक गोऱ्हे (वय ४३ वर्षे,रा भक्तीधाम अपार्टमेंन्ट, नर्सिंग कॉलेजच्यामागे, इंदिरानगर, नाशिक) यांना व्यापारासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी संशयीत आरोपी जितेंद्र श्रावण चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता संशयित आरोपी यांनी वेळोवेळी गोऱ्हे यांच्याकडून व्यवसायासाठी लोन मंजुर करण्याचे आमिश दाखवले.
व्हॉटसअपव्दारे लोन मंजुर झाल्याचे पत्र पाठवुन फिर्यादीचा विश्वास संपादन करत लोन मंजुर करुन देण्याच्या नावाखाली प्रोसेसिंग फी तसेच इतर फी द्यावी लागेल याकरीता वेळोवेळी त्यांच्या कडुन ९ लाख ६० हजार रुपये उकळले. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर करत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा